
राज्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ! दिवाळीच्या सुट्ट्यांची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर सुट्टी मिळाली आहे.
मात्र, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या सुट्ट्यांमध्ये एक दिवसाचा फरक ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दिवाळीत नेमक्या किती सुट्ट्या मिळणार? जाणून घेऊयात पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, राज्यातील प्राथमिक शाळांना २ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच १५ दिवसांची सुट्टी असणार आहे. तर माध्यमिक शाळांना २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत १६ दिवस सुट्टी मिळणार आहे.
म्हणजेच प्राथमिक शाळा १८ नोव्हेंबरला, तर माध्यमिक शाळा १९ नोव्हेंबरला पुन्हा सुरू होतील. पण विद्यार्थ्यांनो, सुट्ट्या संपल्यानंतर लगेच परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
कारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संकलित चाचणी क्रमांक एक घेतली जाणार आहे. यामध्ये गणित, इंग्रजी आणि मराठी विषयांची चाचणी होणार आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद घ्या, पण अभ्यासाकडेही लक्ष ठेवा ! तर मग विद्यार्थी मित्रांनो तुमच्या शाळेला किती दिवसांची सुट्टी मिळाली ? कमेंट करून नक्की सांगा!





