
पाथर्डी तालुक्यात अवघ्या दोन दिवसांत अपघातांच्या तीन घटना घडल्या आणि दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुठे दुचाकीला अपघात झाला, तर कुठे भरधाव ट्रकने धडक दिली. नेमकं काय घडलंय ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, पहिली घटना शनिवारी रात्री साकेगाव शिवारात घडली. शिवाजी हरिभाऊ लगड हे दुचाकीवरून पाथर्डीकडे येत असताना धोकादायक वळणावर त्यांचा अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरी घटना रविवारी सकाळी शेवगाव रोडवर घडली.
दत्तू आठरे आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई दुचाकीवरून जात असताना भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. उपचारादरम्यान दत्तू आठरे यांचा मृत्यू झाला, तर इंदूबाई गंभीर जखमी झाल्या.
तिसऱ्या घटनेत जुन्या बसस्थानकाजवळ एसटीचा धक्का लागून ७५ वर्षीय भानुदास देवढे जखमी झाले. या अपघातांमुळे पाथर्डीत चिंता वाढली आहे. तर मग मंडळी वाढत चालेल्या रस्ते अपघातांबद्दल तुमचे मत काय ? कमेंट करून नक्की सांगा.





