
विद्यार्थ्यांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांचं प्लॅनिंग करण्याआधी ही बातमी नक्की पाहा! कारण यंदा प्रत्येक जिल्ह्यात शाळा सुरू होण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. कसं आहे जिल्हानिहाय वेळापत्रक, सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, राज्याच्या मूळ वेळापत्रकानुसार २ ते १४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी होती. मात्र, काही जिल्ह्यांनी त्यात बदल केले आहेत. पुणे, सातारा आणि सांगलीमध्ये ५ ते १८ नोव्हेंबर सुट्टी असून १९ नोव्हेंबरला शाळा सुरू होतील.
नांदेड, परभणी आणि हिंगोलीमध्ये ५ ते २३ नोव्हेंबर सुट्टी आहे. गुरुनानक जयंतीमुळे शाळा २५ नोव्हेंबरला सुरू होतील. लातूरमध्येही २५ नोव्हेंबरपासून वर्ग भरणार आहेत.
तर नागपूरमध्ये १७ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. तर मग मंडळी तुमच्या जिल्ह्यात शाळांना कधीपासून सुट्ट्या लागतायेत? कमेंट करून नक्की सांगा.





