Latest

दुष्काळाच्या सावटात जिल्हा बँकेची निवडणूक; बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, पहा संपूर्ण वेळापत्रक…

ऐन दिवाळीत अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा राजकीय बार फुटणार आहे ! जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. २८ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर २१ ऑक्टोबरपर्यंत माघार घेण्याची संधी असेल.

२२ ऑक्टोबरला उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होईल, २ नोव्हेंबरला मतदान आणि ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी होत आहे.

मात्र, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे विकास सोसायटी मतदारसंघातून तालुकानिहाय अनेक शिलेदार संचालकपदासाठी इच्छुक आहेत. निवडणूक बिनविरोध झाली तर महायुतीकडून कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. त्यामुळे आता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button