Latest

मुंबईत नाश्ता, पुण्यात लंच ! मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे प्रवास होणार सुपरफास्ट….; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा, कसा असणार प्रोजेक्ट?

मुंबई आणि पुणेकरांसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी बातमी दिली आहे. मुंबई-पुणे दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली असून, या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

यासोबतच मुंबईकरांसाठी तब्बल 238 नव्या एसी लोकलला मंजुरी देण्यात आली आहे. 2027 मध्ये पहिली एसी लोकल धावण्याची शक्यता असून, 2030 पर्यंत सर्व मंजूर एसी लोकल सेवेत आणण्याचे नियोजन आहे.

मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या सध्या सुमारे 3200 असून ती 3500 पर्यंत वाढवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. गर्दी कमी करण्यासाठी 15 डब्यांच्या लोकलची संख्याही वाढवली जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी यंदा 350 विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार असून, गरज पडल्यास आणखी 20 गाड्या वाढवण्याची तयारी रेल्वेने ठेवली आहे. म्हणजेच मुंबई-पुणे प्रवाशांसाठी येणारा काळ अधिक वेगवान आणि आरामदायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button