
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे ! आता परवानगीसाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा मारण्याची गरज कमी होणार आहे.
मंडळी, अहिल्यानगर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सवासाठी आवश्यक काही परवानग्या आता ऑनलाइन घेता येणार आहेत. महापालिकेच्या ‘amcfest’ संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मंडप उभारणी आणि अधिकृत वीजजोडणीसंदर्भातील परवानगीसाठी या सुविधेचा उपयोग करता येणार आहे.
ऑनलाइन अर्ज करताना अर्जदाराचे नाव, पत्ता, आधार कार्ड, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची यादी, मोबाइल क्रमांक आणि मंडपाच्या जागेचा स्थलनकाशा अशी कागदपत्रे आवश्यक असतील.
मंडळांनी ध्वनिक्षेपकाच्या नियमांचे पालन करणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेणे, मंडप सुरक्षित उभारणे आणि अग्निसुरक्षेची साधने उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे.
महापालिकेकडे परवानगीसाठी १३ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. शहरात सुमारे ३०० सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यामुळे यंदाच्या उत्सवासाठी ही ऑनलाइन सुविधा कार्यकर्त्यांची धावपळ नक्कीच कमी करणार आहे.





