
अहिल्यानगरच्या नगर तालुक्यात कर्जमाफीच्या रकमेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एकूण १०२ कोटी रुपयांच्या कर्जमाफीपैकी तब्बल ४८ कोटी रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
मात्र, उर्वरित ५२ कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. तांत्रिक अडचणी दूर करून ही रक्कम लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार अक्षय कर्डिले यांनी दिली.
दरम्यान, नगर तालुक्यातील ११० सहकारी सोसायट्यांपैकी ६८ सोसायट्या अनिष्ट तफावतीत गेल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात सुमारे १९१ कोटी रुपयांची एका वर्षाची थकबाकी असून, त्यापैकी १०२ कोटींची कर्जमाफी झाली आहे.
थकबाकीदारांकडून वसुलीसाठी कलम १०१ अंतर्गत कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





