Latest

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू, ऑक्टोबरच्या हफ्त्याबाबतही समोर आले मोठ अपडेट

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी महिलांना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय. नेमकं काय घडलं? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

सोमवार, १६ नोव्हेंबरपासून ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी महिलांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार क्रमांक नोंदवावा लागत आहे. त्यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाईलवर ओटीपी येणे अपेक्षित आहे.

मात्र, अनेक महिलांना ओटीपीच मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया अर्धवट राहत आहे. वेबसाइटवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सर्व्हरवर ताण आल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महा ई-सेवा आणि सेतू केंद्रांवरही महिलांची गर्दी होत आहे. दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पण, याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तर मग मंडळी तुमच्या मते ऑक्टोबरचा हफ्ता कधी मिळणार? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button