
रेशन दुकानातून मिळणारं स्वस्त धान्य अचानक बंद झालं तर कुटुंबाचा महिन्याचा बजेट कसं सांभाळणार? अहिल्यानगरच्या नागरिकांसमोर हाच प्रश्न उभा राहिला आहे.
मंडळी, अहिल्यानगरमधील तब्बल १ लाख ८९ हजार शिधापत्रिकाधारकांना मोठा धक्का बसलाय. नेमकं काय घडलंय? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मित्रहो, राज्य सरकारच्या ‘मिशन सुधार’ मोहिमेत जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार १४ लाभार्थ्यांना सवलतीच्या धान्याच्या प्राधान्य गटातून वगळण्यात आलं आहे. यामध्ये प्राप्तिकर भरणारे, बनावट लाभार्थी, निष्क्रिय शिधापत्रिकाधारक, वाहनधारक आणि इतर निकषांमध्ये बसणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.
मात्र लक्षात घ्या, त्यांची रेशनकार्ड बंद झालेली नाहीत. फक्त त्यांना सवलतीच्या दरात धान्य मिळणार नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना आणि सणासुदीच्या काळात ही मोहीम राबवल्याने विरोध सुरू झाला आहे.
ही मोहीम तात्पुरती थांबवण्याची मागणीही होत आहे. तर मग मंडळी तुम्हाला सरकारचा हा निर्णय कसा वाटला ? कमेंट करून नक्की सांगा.





