Latest

मिरवणूक पुढे नेण्यास सांगितलं आणि पोलिस कर्मचाऱ्यासोबत भयंकर घडलं, अहिल्यानगरमध्ये नेमक काय झालं ?

अहिल्यानगर शहरातील नेताजी सुभाष चौकात मिरवणुकीदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री माळीवाडा ते सर्जेपुरा मार्गावर निशान मिरवणूक सुरू असताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच मिरवणुकीसाठी देण्यात आलेली परवानगीची वेळ संपत आल्याने पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते.

कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अनुप झाडबुके हे साध्या वेशात बंदोबस्तावर होते. त्यांनी हिंदवी शौर्य वाद्य पथकातील सदस्यांना मिरवणूक पुढे नेण्याची विनंती केली. मात्र, यावरून वाद निर्माण झाला.

सुनील शंकर करांदे आणि त्याच्या तीन साथीदारांनी पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.

या झटापटीत झाडबुके किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button