Latest

ऐकावे ते नवलंच ! अवघ्या ८ दिवसांच्या शेळीच्या पिलाला फुटला पान्हा ; पण असं का घडलं? शास्त्रज्ञांनी सांगितले खरं कारण ?

बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड गावात एक अजब घटना समोर आली आहे. सुदाम कटारे यांच्या शेळीने काही दिवसांपूर्वी तीन पिलांना जन्म दिला. त्यापैकी अवघ्या आठ दिवसांच्या एका पिलाच्या स्तनातून दूधसदृश द्रव येत असल्याचं आढळून आलं.

गेल्या सात दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने कटारे कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये आश्चर्य आणि कुतूहल निर्माण झालं. शेळीपालनाचा अनुभव असलेल्या नागरिकांनाही एवढ्या कमी वयाच्या पिलामध्ये असा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो.

या घटनेबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सीधर तंबरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या मते, जनुकीय बदलामुळे असा असामान्य शारीरिक प्रकार घडू शकतो. लाखो शेळ्या-मेंढ्यांमध्ये एखाद्या प्राण्यात अशी घटना दिसू शकते आणि घाबरण्याचं कारण नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

योग्य उपचार आणि पशुवैद्यकीय देखरेखीखाली हा प्रकार थांबू शकतो. त्यामुळे पिलाला स्वतःहून औषध न देता तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button