Latest

एका दिवसाला किती वेळा ट्रॅफिक चालान आकारला जाऊ शकत ? RTO चा हा नियम 99% वाहनचालकांना माहितीच नाही

एका दिवसात तुमच्या गाडीवर फक्त एकच ट्रॅफिक चालान होऊ शकतं, असं तुम्हालाही वाटतंय का? तर हा गैरसमज आजच दूर करा!

मंडळी, भारतामध्ये एका दिवसात फक्त एकच चालान आकारलं जातं, असा कोणताही सार्वत्रिक नियम नाही. सकाळी एखाद्या वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यानंतर त्यासाठी दंड भरला, तरी त्याच दिवशी पुन्हा नियम मोडल्यास कारवाई होऊ शकते.

उदाहरणार्थ, अतिवेगाने वाहन चालवणं, लाल सिग्नल तोडणं किंवा चुकीच्या दिशेने वाहन चालवणं यांसारख्या उल्लंघनांची पुनरावृत्ती झाल्यास स्वतंत्र कारवाई होऊ शकते.

मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक उल्लंघनाची परिस्थिती आणि स्वरूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे एकदा चालान भरल्यानंतर दिवसभर वाहतूक नियम तोडण्याची परवानगी मिळते, हा समज चुकीचा आहे. म्हणून रस्त्यावर वाहन चालवताना चालानच्या भीतीपेक्षा स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता लक्षात ठेवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button