Latest

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी २ हजार रुपये ! हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारची मोठी तयारी!

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजार रुपयांची अग्रीम मदत दिल्यानंतर आता आणखी २ हजार रुपयांचा हप्ता देण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मंडळी, ही बातमी तुम्ही पाहताय, पण त्याआधी शेतकरी आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी AhilyanagarLive24 ला फॉलो करायला विसरू नका!मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या मदतीच्या निकषांमध्ये वाढ झाल्यामुळे राज्य सरकार सुधारित प्रस्ताव तयार करत आहे.

हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.दरम्यान, राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी १० तालुक्यांची भर पडण्याची शक्यता आहे.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री याबाबत घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसऱ्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.मंडळी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणखी २ हजार रुपयांची मदत मिळायला हवी का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button