Latest

अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर….; पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ! ‘या’ जिल्ह्यांना पंजाबराव डख यांचा मुसळधार पावसाचा हाय अलर्ट

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, आता पुढील ४८ ते ७२ तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेडमध्येही पावसाची शक्यता आहे. याशिवाय सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नंदुरबार, नाशिक, बीड, लातूर, परभणी आणि हिंगोलीसह काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो.

मात्र हा पाऊस सर्वदूर होणार नसून काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता कमी राहू शकते. भारतीय हवामान विभागानेही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button