नगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या. पहिली घटना नेवासा तालुक्यातील खरवंडी गावात घडली. खरवंडी येथील नूरखा बाबूलाल शेख या ६५ वर्षीय वृद्धाने, तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून अश्लील कृत्य करुन घेतले. विशेष म्हणजे ही तिन्ही मुले अगदी तिसरी-चौथीची आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर हिंदूत्ववादी संघटनांनी गुरुवारी खरवंडी बंदची हाक देत सगळे व्यवहार बंद ठेवले. त्यानंतर सायंकाळी निषेध मोर्चाही काढण्यात आला. याच दिवशी नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील फरहान सादिक शेख याच्याविरोधातही एक गुन्हा दाखल झाला. फरहानने एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीला ब्लँकमेल करत, तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. हे दोन्ही प्रकार भयंकर आहेत.नगर जिल्ह्यात कायद्याचं राज्य आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आलाय.
पहिला प्रकार नेवासा तालुक्यातील खरवंडी गावात घडला. या गावातील काही सोशल मिडिया ग्रुपवर गावातीलच एका नराधमाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत नूरखा बाबुलाल शेख हा ६५ वर्षीय वृद्धाने एका विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचे दिसत आहे. नूरखा अत्याचार करत असताना कुणीतही त्याचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली. नूरखा याने केवळ एका विद्यार्थ्यावर नाही तर तीन विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याच्या चर्चा सुरु झाल्या. व्हिडीओची चर्चा झाल्यानंतर गावात तणाव पसरला. गावातील काही हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी या प्रकाराला जिदादचे नाव देत गावबंदची हाक दिली. ग्रामस्थांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुरुवारी खरवंडी गाव बंद राहिले. सायंकाळी पाच वाजता याच प्रकाराचा निषेध म्हणून गावातून मोर्चा काढण्यात येणार आहे. या नराधमाला फाशी देण्याची मागणी संपप्त ग्रामस्थांनी केली आहे. सोनई पोलिस या प्रकरणाचा तपास करणार आहेत. परंतु अत्तापर्यंत याबाबत फिर्याद दाखल आहे की नाही, याबाबत माहिती समजली नाही. हा व्हिडीओ कधीचा आहे आणि तो खरंच संशयीत आरोपीचाच आहे का, याचा तपास सुरु आहे.
दुसरी घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात घडली. वांबोरी परिसरातील १८ वर्षाची विद्यार्थीनी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायला नगर शहरात येते. त्याच गावातील फरहान सादिक शेख हाही तिच्या वर्गात आहे. याच ओळखीतून फरहानने तिच्यासोबत काही दिवसांपूर्वी सेल्फी फोटो काढले होते. फोटो काढल्यावर काही दिवस फरहान शांत राहिला परंतु नंतर त्याने त्याच फोटोवरुन या तरुणीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या विद्यार्थीनीला हे फोटो व्हायरल करण्याची व तिच्या पालकांना पाठविण्याची धमकी देत फरहानने या विद्यार्थीनीला २ मार्च आणि १८ मार्चला तो डोंगरगणला घेऊन आला. तेथे त्याने या विद्यार्थीनीवर अत्याचार केला.
या प्रकारानंतर आपल्या शिक्षणावर परिणाम होईल म्हणून या विद्यार्थीनीने घडलेली घटना कुणालाच सांगितली नाही. त्यानंतर मात्र फरहानने तिला स्नॅपचॅटवर तिचे अर्धनग्न व्हिडीओ पाठवायला सांगितले. त्यानंतर मात्र या विद्यार्थीनीच्या पायाखालची जमीनच सरकली. फरहान आता काहीही करायला सांगत असल्याने ही विद्यार्थीनी घाबरुन गेली. फरहानने या विद्यार्थीनीला तिचे जुने फोटो दाखवत पुन्हा व्हिडीओ पाठविण्याची धमकी दिली. आपल्या घरच्यांना हा प्रकार समजल्यावर आपले शिक्षण बंद होईल, या भितीने या तरुणीने फरहानला व्हिडीओही पाठवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. परंतु त्यानंतरही फरहानचे अश्लील प्रकार थांबले नाहीत. तिने त्या विद्यार्थीनीला त्रास देणे वारंवार सुरु ठेवले. अखेर कंटाळून या विद्यार्थीनीने हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर या दोघींनी तोफखाना पोलिस ठाण्यात येऊन फरहान सादिक शेख याच्याविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली.
हे दोन्हीही प्रकार गंभीर आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. परंतु या प्रकारानंतर हिंदूत्ववादी संघटना मात्र आक्रमक झाल्या आहेत.




