
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या हरिश्चंद्र गडावर एक धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील अवघ्या २० वर्षांच्या तरुणाने गडावरून खोल दरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं. नेमक काय घडलंय? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, खुशाल चेनाराम प्रजापती असं मृत तरुणाचं नाव असून तो राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, खुशाल कोणालाही काहीही न सांगता हरिश्चंद्र गडावर आला होता. १४ नोव्हेंबर दुपारी दीड वाजल्यापासून ते १५ नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडल्याची नोंद आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मामाने राजूर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, घटनास्थळ टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण ठाणे जिल्ह्यातील टोकावडे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे.
मात्र, या तरुणाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.





