Latest

बिनविरोध होता होता राहिलेल्या आशुतोष काळेंचा दमदार विजय ADCCत दिमाखदार एन्ट्री

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नियोजनाप्रमाणे सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झाली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत शेतीपूरक मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर करण्यात आली. शेतीपूरक आणि शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघात एकूण ८८४ मतदार होते.

सुरुवातीला राष्ट्रवादीचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची या जागेवरून बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती.परंतु शेवटच्या क्षणी परिवर्तन पॅनलचे सुधीर म्हस्के यांनी माघार न घेता निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला.

ही निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु अपेक्षेप्रमाणे आ. आशुतोष काळे यांनी या निवडणुकीत बाजी मारली.काळे यांना ७५० मते तर म्हस्के यांना १२४ मते मिळाली. या निकालामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button