Latest

समृद्धी महामार्गाच्या शेजारून धावणार रेल्वे ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत ?

समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवासाचा वेग वाढला. आता याच महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. समृद्धी महामार्गाला समांतर रेल्वेचा विस्तृत आराखडा तयार करण्याचे काम महाराष्ट्र रेल कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे महामार्ग उभारताना रेल्वेसाठी आवश्यक जागाही राखून ठेवण्यात आली होती.

या रेल्वेमार्गातून केवळ प्रवासी वाहतूकच नाही, तर मालवाहतुकीलाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. जेएनपीटीहून नाशिक, जालना मार्गे वर्धा येथील ड्राय पोर्टपर्यंत आणि पुढे गडचिरोलीपर्यंत समर्पित रेल्वेमार्ग उभारण्याची संकल्पना आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना नवी कनेक्टिव्हिटी मिळू शकते. मालवाहतूक जलद झाल्यास औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही हातभार लागण्याची अपेक्षा आहे.

समृद्धी महामार्गानंतर आता त्याच मार्गावर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात येणार का? महाराष्ट्राच्या पायाभूत विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button