
विखे-शिंदे एकाच व्यासपीठावर येणार का? अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात सध्या याच चर्चेला उधाण आलंय! मंडळी शिक्षक दिनानिमित्त लोणी येथे आदर्श शिक्षकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांसह विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, शिंदे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे आणि शिंदे यांच्यातील राजकीय दुरावा चर्चेत आला आहे. जिल्हा बँकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत राम शिंदे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर लोणीतील कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच मंचावर दिसणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीनंतर आता राम शिंदे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे शिंदे येणार का, याची उत्सुकता वाढली आहे.





