Latest

पारनेरकरांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय ! पारनेर ते पुणे बससेवेला मंजुरी, कस राहणार वेळापत्रक?

पारनेरसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण पारनेर ते पुणे बससेवेला अखेर मंजुरी मिळाली आहे. ही बससेवा नेमकी कधी सुरू होणार आणि तिचं वेळापत्रक कसं आहे ? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, निघोज व्यापारी असोसिएशनच्या अनेक महिन्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं आहे. येत्या १ डिसेंबरपासून पारनेर ते पुणे एसटी बससेवा सुरू होणार आहे.

या बसचा प्रवास सकाळी ७ वाजता पारनेरमधून सुरू होईल. देवीभोयरे फाटा, निघोज, कुंड पर्यटन क्षेत्र, टाकळी हाजी, रांजणगाव आणि शिक्रापूरमार्गे ही बस पुण्यातील शिवाजीनगरला पोहोचेल. तर परतीचा प्रवास सायंकाळी ५ वाजता शिवाजीनगर येथून सुरू होईल.

विशेष म्हणजे पुण्यातून व्यापारी साहित्य खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या व्यापाऱ्यांसह विद्यार्थी आणि प्रवाशांनाही या बससेवेचा फायदा होणार आहे.

या निर्णयासाठी खासदार नीलेश लंके, आमदार काशिनाथ दाते आणि एसटी महामंडळाचे व्यापारी असोसिएशनने आभार मानले आहेत. तर मग मंडळी तुम्हाला या बससेवेचा फायदा होणार आहे का? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button