Latest

नियतीचा क्रूर खेळ ! कल्याण – नगर महामार्गावर भीषण अपघात, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा तडफडून मृत्यू… हसत-खेळत कुटुंब उद्ध्वस्त !

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अवजड वाहनांच्या ओव्हरटेकच्या घाईने पुन्हा एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पती-पत्नी दुचाकीवरून प्रवास करत होते, पण रस्त्यात झालेल्या एका अपघाताने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं.

ही घटना जुन्नर तालुक्यातील राजुरी गावाजवळ सह्याद्री महाविद्यालयासमोर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सातेवाडी येथील राजू साहेबराव मुठे हे पत्नी जाईबाई यांच्यासोबत दुचाकीवरून जात होते.

त्याचवेळी एमएच ४० बीएल ६०४७ क्रमांकाचा ट्रक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकीला धडक बसली. या अपघातात राजू मुठे गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर पत्नी जाईबाई गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर मग मंडळी तुम्हाला या अपघाताबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button