
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यासह राज्याला पावसाने चांगलेच झोडपले होते. राज्यातील विविध भागातील पिके व जमीनी अक्षरशः वाहून गेल्या होत्या. नगर जिल्ह्यातही सुमारे 6 लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या नुकसानीनंतर महिनाभरात दिवाळीचा सण तोंडावर होता. सरकारने तातडीने पंचनामे केले खरे, पण नुकसानग्रस्तांना मदत खरंच मिळेल का, याची मात्र शंका होती. अगदी दिवाळीपूर्वी दोन दिवस, शेतकरी या मदतीकडे डोळे लावून बसला होता. अखेर दिवाळीच्या आदल्या दिवसापासून शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेच्या खात्याचे मॅसेज पडू लागले आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी थोडी-फार का होईना साजरी झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले. जिल्ह्यातील महसूल व कृषि विभागाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देत विखे पाटलांनी, सुमारे सहा लाख हेक्टर क्षेत्राचे विक्रमी वेळेत नियोजन केले. पालकमंत्री विखे पाटील हेच खऱ्या अर्थाने या मागचे हिरो ठरले, असे त्यांचे कार्यकर्ते सांगताहेत. नगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला किती मदत मिळावी, हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत….
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा नगर जिल्ह्यातील सुमारे 6 लाख हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला होता. अनेक ठिकाणची उभी पिके आडवी झाली. या अनुषंगाने महायुती सरकारने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील बाधित शेतकर्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 3 हजार 258 कोटी 56 लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला.
पंचनामा झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याला 846 कोटी 96 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीचा लाभ जिल्ह्यातील 8 लाख 27 हजार 118 शेतकऱ्यांना मिळाला. मदतीचा निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना मंत्री विखे व माजी खा. डाँ. सुजय विखे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. दिवाळीपूर्वी एक दिवस ही मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळाली, अन् शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थोडा दिलासा मिळाला.
सप्टेंबर महिन्यांतील 13 ते 30 तारखेपर्यंत झालेल्या पावसाचा
⦁ नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 1 हजार 344 गावांना फटका बसला.
⦁ नगर जिल्ह्यातील 6 लाख 2 हजार 194 हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र त्यामुळे बाधित झाले होते.
⦁ फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे 8 लाख 27 हजार 118 होती.
⦁ त्यात जिरायत क्षेत्र 2 लाख 15 हजार 693 हेक्टर
⦁ बागायती क्षेत्र 3 लाख 74 हजार 541 हेक्टर
⦁ आणि फळबागाचे क्षेत्र 11 हजार 959 हेक्टर क्षेत्र होते.
⦁ मंत्री विखेंच्या पुढाकाराने अवघ्या 15 दिवसांत पंचनामे होऊन महसूल आणि कृषी विभागाच्या एकत्रित सहीने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार ही मदत जाहीर करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला किती रक्कम मिळाली ते आपण पाहू…
⦁ अहिल्यानगर तालुक्यात 117 गावांत
36 हजार 582 हेक्टरवरील 48 हजार 517 शेतकर्यांना
50 कोटी 13 लाख
⦁ पारनेर तालुक्यातील 99 गावांमधील
52 हजार 708 शेतकर्यांना 34 हजार 168 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे
44 कोटी 51 लाख 97 हजार.
⦁ पाथर्डी तालुक्यातील 137 गावामधील
⦁ 1 लाख 7 हजार 643 शेतकर्यांचे 66 हजार 310 हेक्टर क्षेत्रावरील
101 कोटी 29 लाख 80 हजार 30 रुपये.
⦁ कर्जत तालुक्यातील 119 गावांमधील
⦁ 65 हजार 578 हेक्टर क्षेत्रावरील 99 हजार 961 शेतकर्यांना
99 कोटी 43 लाख 25 हजार रुपये.
⦁ जामखेड तालुक्यातील 87 गावांमधील
55 हजार 481 शेतकर्यांचे 54 हजार 444 हेक्टर क्षेत्रासाठी
57 कोटी 30 लाख रुपये.
⦁ श्रीगोंदा तालुक्यातील 115 गावांमधील
67 हजार 674 शेतकर्यांचे 44 हजार 191 हेक्टर क्षेत्रासाठी
71 कोटी 52 लाख 50 हजार रुपये.
⦁ श्रीरामपूर तालुक्यातील 55 गावांमधील
40 हजार 741 शेतकर्यांचे 31 हजार 395 हेक्टर क्षेत्राला
39 कोटी 25 लाख 63 हजार रुपये.
⦁ राहुरी तालुक्यातील 96 गावांमधील
41 हजार 923 हेक्टर क्षेत्रावर 58 हजार 940 शेतकर्यांना
64 कोटी 3 लाख 12 हजार रुपये.
⦁ नेवासा तालुक्यातील 127 गावांमधील
72 हजार 948 हेक्टर क्षेत्रावर 98 हजार 272 शेतकर्यांना
107 कोटी 44 लाख 79 हजार रुपये.
⦁ शेवगाव तालुक्यातील 113 गावांमधील
78 हजार 469 शेतकर्यांचे 65 हजार 562 हेक्टर क्षेत्रासाठी
107 कोटी 25 लाख 91 हजार रुपये.
⦁ संगमनेर तालुक्यातील 108 गावांमधील
25 हजार 971 शेतकर्यांच्या 16 हजार 435 हेक्टर क्षेत्रासाठी
22 कोटी 20 लाख 3 हजार रुपये.
⦁ अकोले तालुक्यातील 30 गावांमधील
2 हजार 44 शेतकर्यांचे 890 हेक्टर क्षेत्रासाठी
76 लाख रुपये.
⦁ कोपरगाव तालुक्यातील 80 गावांमधील
45 हजार 207 शेतकर्यांचे 33 हजार 143 हेक्टर क्षेत्रासाठी
39 कोटी 22 लाख 87 हजार रुपये.
⦁ राहाता तालुक्यातील 61 गावांमधील
45 हजार 490 शेतकर्यांचे 38 हजार 621 हेक्टर क्षेत्रासाठी
42 कोटी 58 लाख 39 हजार रुपये.
अशी एकूण 848 कोटी 96 लाख रुपयांची नुकसानभरपाई नगरच्या शेतकऱ्यांना मिळाली.





