Latest

अहिल्यानगरमध्ये किरकोळ वादातून रक्तरंजित हल्ला; कोयत्याने थेट तरुणाच्या हाताची बोटचं तोडली ! नेमक प्रकरण काय ?

गणपतीच्या काळातील वाद पुन्हा उफाळला आणि थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अहिल्यानगरच्या सिद्धार्थनगरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं ? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह २४ ला नक्की फॉलो करा.

मंडळी, १ नोव्हेंबरच्या रात्री सिद्धार्थनगर चौक आणि सुडकमेळ कमानीजवळ हा प्रकार घडला. सचिन साठे यांचा मुलगा घरी येऊन काही जण गणपतीच्या जुन्या वादातून भांडण करत असल्याचं सांगतो. त्यानंतर सचिन साठे घटनास्थळी पोहोचले.

मात्र, तिथे पाच जणांनी त्यांना अडवून कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये सचिन शेलार याने कोयत्याने डाव्या हातावर वार केला आणि त्यांची बोटं तुटल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

या प्रकरणी सचिन शेलार, अभि शेलार, रुपेश शेलार, राऊसाहेब ठोकळ आणि निखिल गायकवाड यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर मग मंडळी, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button