Latest

साखर उत्पादनात अहिल्यानगरची मोठी झेप ! आतापर्यंत इतक्या लाख क्विंटल साखरेचं उत्पादन

महाराष्ट्रात ऊस गाळप हंगामाला वेग आला आहे. पण यंदा अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरुवातीलाच विक्रमी उत्पादन घेतलंय. साखर उत्पादनाची नेमकी आकडेवारी कशी आहे ? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह २४ ला नक्की फॉलो करा.

मंडळी, २०२६-२७ च्या गाळप हंगामात १ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील १२४ साखर कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी मिळून ९७.४६ लाख टन उसाचं गाळप केलं असून, ७७.०७ लाख क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलं आहे.

यामध्ये अहिल्यानगर विभागातील २० कारखान्यांचा समावेश आहे. त्यापैकी ११ सहकारी आणि ९ खासगी कारखाने आहेत. या कारखान्यांनी १६.६१ लाख टन उसाचं गाळप करून १३.०५ लाख क्विंटल साखर तयार केली आहे.

विभागाचा साखर उतारा ७.८६ टक्के आहे. दुसरीकडे पुणे विभागात सर्वाधिक २३.६ लाख क्विंटल साखर उत्पादन झालं, तर कोल्हापूर विभागाचा उतारा सर्वाधिक ९.०३ टक्के आहे. तर मग मंडळी तुमच्या भागातील कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झालाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button