Latest

सोन्याचा भाव थेट २.३८ लाखांवर जाणार? अर्थतज्ज्ञांच्या भविष्यवाणीने सराफा बाजारात खळबळ!

सध्या सोन्याचे भाव घसरत असल्यामुळे ग्राहकांना खरेदीची संधी मिळतेय. पण हीच घसरण सोन्याच्या मोठ्या तेजीआधीची शांतता ठरणार का?

कारण एका प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांनी सोन्याच्या भावाबाबत केलेल्या भविष्यवाणीने बाजारात चर्चांना उधाण आलंय. नेमकी कशी आहे ही भविष्यवाणी? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, अर्थतज्ज्ञ अलेस्टर मॅकलॉड यांच्या मते, येत्या सहा महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ८ हजार डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो.

भारतीय चलनात याचा विचार केला, तर १० ग्रॅम सोन्याची किंमत जवळपास २ लाख ३८ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

मॅकलॉड यांच्या मते, सोन्याची वाढती किंमत ही केवळ सोन्याची तेजी नसून अमेरिकन डॉलरची घसरती क्रयशक्तीही त्यामागचं मोठं कारण आहे.

आर्थिक बाजारातील अनिश्चितता आणि डॉलरवरील संभाव्य दबावामुळे सोन्याचं महत्त्व वाढू शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग मंडळी, तुमच्या मते सोनं २.३८ लाखांवर जाणार का? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button