
यंदा कापसाचे बाजारभाव हमीभावापेक्षाही जास्त मिळताना दिसत आहेत ! पण सीसीआयची खरेदी सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना नेमका किती भाव मिळणार ? चला, समजून घेऊयात. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, यवतमाळसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सीसीआयची खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. मात्र, शुभारंभाच्या वेळी केंद्रांवर कापूसच आला नाही. यवतमाळमध्ये दसऱ्यानंतर खरेदी सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
यंदा केंद्र सरकारने कापसासाठी प्रतिक्विंटल ८ हजार २६७ ते ८ हजार ६६७ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. पण बाजारात कापसाची आवक कमी असल्याने जळगावसह काही ठिकाणी ९ हजार ३०० ते ९ हजार ६०० रुपये दर मिळाला आहे.
काही बाजारांत कापसाचे दर थेट 10000 रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान यंदा कापूस विक्रीची नोंदणी करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी किसान ॲपला ॲग्रीस्टॅक क्रमांक जोडण्याचा प्रयोग केला जात आहे. तर मग मंडळी, तुम्ही किसान अँपवर नोंदणी केली आहे का ? कमेंटमध्ये नक्की सांगा.





