Latest

अहिल्यानगर ब्रेकिंग : भाजपा नेते पाशा पटेल यांची त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता, न्यायालयाचा मोठा निकाल ! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अहिल्यानगर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते पाशा पटेल यांची एका प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे. नेमकं काय होतं संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊयात पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.

मंडळी, भाजपाचे नेते आणि महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची जामखेडमधील जाहीर सभेत केलेल्या कथित अश्लील वक्तव्य आणि हावभावांच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी कर्जत-जामखेड मतदारसंघातील तत्कालीन भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जामखेडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेत पाशा पटेल यांनी अश्लील हावभाव आणि वक्तव्य केल्याचा, तसेच सार्वजनिक शांतता भंग होईल असं कृत्य केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं.

या खटल्यात सरकार पक्षाच्या सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. अखेर अहिल्यानगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांनी पाशा पटेल यांची निर्दोष मुक्तता केली. या निकालाबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट नक्की करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button