Latest

अहिल्यानगरकरांनो सावधान… एकाच दिवशी चार जण बेपत्ता; तीन तरुणींचा समावेश, जिल्ह्यात नेमक काय घडतंय ?

अहिल्यानगर शहरात एकाच दिवशी अपहरणाच्या चार वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण ? सांगतो. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.

मंडळी, पहिली घटना केडगाव येथील बालगृहात घडली. १८ वर्षीय युवती १९ ऑक्टोबर रोजी दुपारी बेपत्ता झाली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत सिद्धार्थ ॲग्रो, मार्केट यार्ड परिसरातून २२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली. तिच्या पतीने अज्ञात व्यक्तीने पत्नीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे.

तिसरी घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. उमेश मनोज दिवटे, वय ३२, यांचे नटराज हॉटेलसमोरून अपहरण झाल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीने दिली आहे.

तर चौथ्या घटनेत नागापूर परिसरातील १९ वर्षीय युवती राहत्या घरातून बेपत्ता झाली. तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिसांत केली.

चारही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलीस तपास सुरू आहे. तुमच्या मते, अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय उपाय करायला हवेत? कमेंटमध्ये नक्की सांगा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button