
अहिल्यानगरच्या राजकारणातील एक परिचित नाव काळाच्या पडद्याआड गेलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पण त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती. चला पाहुयात. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
केडगावच्या सरपंचपदापासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. पुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती आणि काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेतृत्वापर्यंत त्यांनी मजल मारली.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असलेली त्यांची मैत्रीही कायम चर्चेत राहिली. १९९९ मध्ये त्यांनी नगर-नेवासा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
नेप्ती येथे कांदा बाजार उभारण्यातही त्यांच्या भूमिकेचा उल्लेख केला जातो. मात्र, अशोक लांडे खून प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला.
या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या राजकारणातील एका वादग्रस्त आणि प्रभावशाली पर्वाचा अंत झाला आहे. भानुदास कोतकर यांच्या राजकीय प्रवासाबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.





