
मराठी चित्रपटसृष्टीत आता तंत्रज्ञानाचा नवा प्रयोग पाहायला मिळणार आहे. कसा आहे हा नवा प्रयोग ? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.
मंडळी, ‘बागुलबुवा’ हा AI च्या माध्यमातून तयार करण्यात आलेला मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा टायटल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, त्याची भव्यता प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटात अभिनेता अभिजीत खांडकेकर झळकणार आहे. त्याच्यासोबत तब्बल ५५ कलाकारांची फौजही असणार आहे. मात्र, या कलाकारांची नावं सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
एस. एस. फिल्म्स प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शरद पाटील आणि अंजली पाटील निर्माते आहेत, तर चेतन चावडा यांनी कथालेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
चित्रपटाच्या टीझरमध्ये अचानक उद्भवणारं संकट आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर डोळ्यांवर होणारा परिणाम दाखवण्यात आला आहे. पण, तुम्हाला काय वाटतं? AI मुळे मराठी सिनेमाचं भविष्य बदलणार का? कमेंट करून सांगा!





