Latest

महाराष्ट्रातील शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी, पुन्हा कधी सुरू होणार शाळा ? समोर आली नवीन अपडेट

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ! दिवाळी जवळ आली असून, राज्यातील मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्टीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. नेमक कसं आहे हे वेळापत्रक? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.

मंडळी, शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार, यंदा २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होणार असून, १४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असेल. त्यानंतर १५ नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे शाळा सोमवार, १६ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होतील.

शैक्षणिक वर्षाचं पहिलं सत्र १५ जूनपासून सुरू झालं असून, ते ३१ ऑक्टोबरला संपणार आहे. दिवाळीनंतर दुसरं सत्र १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होऊन १ मे २०२७ पर्यंत चालेल. तसंच, दुसरं सत्र संपल्यानंतर ३ मे ते १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी असेल.

शाळांनी सुट्ट्यांच्या वेळापत्रकात स्वतःहून बदल करू नये, अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत. पण मंडळी दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही कुठे फिरायला जाणार ? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button