
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकार महिलांसाठी आणखी एक योजना आणण्याच्या तयारीत आहे. नेमकी कशी आहे नवीन योजना? सांगतो आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, पतीचं निधन झालेल्या, घटस्फोटित, परित्यक्ता आणि आजीवन अविवाहित महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार देणं, हा या प्रस्तावित योजनेचा मुख्य उद्देश आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे.
राज्यात अशा १२ लाखांहून अधिक महिला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या योजनेच्या नियोजनासाठी सध्या माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. शिक्षण विभागाकडून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वडील नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली जात आहे. पुढे तहसील आणि गावपातळीवरही सर्वेक्षण केलं जाणार आहे.
मात्र, अद्याप योजनेची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे किती आर्थिक मदत मिळणार, अर्ज कसा करायचा आणि पात्रतेच्या अटी काय असतील, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. पण एकल महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक योजना खरच पाहिजे का? कमेंट करून सांगा!





