
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ! दारणा प्रकल्पावरील गोदावरी कालव्याच्या २०२६-२७ च्या रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पाणीवाटपाचं नियोजन निश्चित करण्यात आलं आहे. नेमकं कस आहे नियोजन? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, राहाता येथे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या नियोजनाला मान्यता देण्यात आली.
रब्बी हंगामात १ ते ३० डिसेंबर २०२६ या काळात ३० दिवसांचं आवर्तन मिळणार आहे. यासाठी २.६२० टीएमसी पाण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
तर उन्हाळी हंगामात तीन टप्प्यांत एकूण ४८ दिवस पाणी सोडलं जाणार आहे. पहिलं आवर्तन १ ते २२ मार्च २०२७, दुसरं ५ ते १७ मे आणि तिसरं १० ते २२ जुलै या कालावधीत प्रस्तावित आहे. या हंगामासाठी ५.१८८ टीएमसी पाणी राखण्यात आलं आहे.
दरम्यान, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केलं. या पाणी नियोजनाचा तुम्हाला किती फायदा होईल? कमेंट करून सांगा!





