Latest

नात्याला काळिमा फासणारी घटना… आजोबाने आठ वर्षांच्या नातीसोबतचं नको ते केलं, अहिल्यानगरची धक्कादायक घटना

अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीसोबत गैरप्रकार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी तिच्याच नात्यातील चुलत आजोबांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमक काय आहे प्रकरण? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदरमल गावात घडल्याची माहिती आहे. मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपी नागनाथ पालवे याने चिमुरडीला पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात बसवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

घडलेला प्रकार चिमुरडीने आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक थोरात आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे पुढील तपास करत आहेत. तुमच्या मते, अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी का ? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button