Latest

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट! राम शिंदेंच्या अडचणी वाढणार…; ज्योती शिंदेंची उमेदवारी धोक्यात ? नेमक प्रकरण काय ?

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राम शिंदे यांच्या अडचणी वाढणार असे दिसत आहे. शिंदे यांच्या सोशल मीडिया पोस्टचा आधार घेत उमेदवार तुषार पिसाळ यांनी निवडणूक प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे. नेमकं काय आहे प्रकरण ? सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

तक्रारीनुसार, संबंधित मतदारसंघातील ७५ मतदारांपैकी ४५ जणांना परराज्यात सहलीसाठी नेल्याचा दावा करण्यात आला आहे. आणखी १५ मतदारांना सहलीसाठी नेण्याचाही उल्लेख असल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे.

या सहलीचा खर्च कोणी केला? मतदारांना काही आर्थिक प्रलोभन दिलं होतं का? आणि या प्रकरणाचा ज्योती प्रकाश शिंदे यांच्या उमेदवारीशी काही संबंध आहे का? असे प्रश्न तक्रारीत उपस्थित करण्यात आले आहेत.

तसंच, निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला का, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता निवडणूक प्राधिकरण काय भूमिका घेतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. पण तुमच्या मते, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी का ? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button