
अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या वडिलांनी मुलांना जन्म दिला, त्याच वडिलांच्या हत्येचा आरोप आता दोन मुलांवर आहे. पण या घटनेमागचं कारण काय ? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, अहिल्यानगर तालुक्यातील वाकोडी शिवारात २४ ऑक्टोबरच्या रात्री अकराच्या सुमारास दिलीप भोसले यांचा पाण्याच्या टाकीजवळ खून करण्यात आला होता. सुरुवातीला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र, स्थानिक गुन्हे शाखा आणि भिंगार कॅम्प पोलिसांनी तपास करत या प्रकरणात मृताचे मुलगे रोहित भोसले, वय २१, आणि अंबर भोसले, वय १९, यांना अटक केली. पोलिसांच्या तपासानुसार, दिलीप भोसले यांना दारूचे व्यसन होते.
ते पत्नीला मारहाण करत असल्याचा आणि मुलांनाही त्रास देत असल्याचा आरोप आहे. याच त्रासातून दोन्ही मुलांनी हे टोकाचं पाऊल उचलल आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कौटुंबिक वादातून घडलेली ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करते. अशा घटनांबाबत तुमचं मत काय ? कमेंटमध्ये नक्की सांगा.





