Latest

मिरीची भविष्यवाणी आली! काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस व महापुराचे संकेत; अन बरंच काही….

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मिरी येथे सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी राजा वीरभद्र उर्फ बिरोबा देवाचा पारंपरिक होईक (भविष्यवाणी) सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुख्य पुजारी सीताराम भगत यांनी ३६ तलवारींचे वार झेलून आगामी वर्षाची मोठी भविष्यवाणी वर्तवली.

या भविष्यवाणीनुसार, आगामी वर्षात वादळी वारे, तीव्र उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस आणि महापुराचे संकट येऊ शकते, ज्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि पशुधनासाठी पुढील काळ काहीसा अडचणीचा राहण्याचा अंदाज आहे.

मात्र, कापसाला चांगला भाव मिळेल आणि गहू-हरभऱ्याचे उत्पादन कमी झाले तरी त्यांना चांगला दर मिळेल, अशी दिलासादायक माहितीही समोर आली आहे. हा सोहळा ऐकण्यासाठी संपूर्ण राज्यातून भाविक मोठ्या संख्येने आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button