Latest

ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका ! या आठवड्यात रिलीज होणार ‘हे’ १० नवे चित्रपट आणि वेबसीरिज

या वीकेंडला घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे ! कारण ओटीटीवर क्राईम थ्रिलर, हॉरर, कॉमेडी आणि रोमँटिक ड्रामाचे नवे पर्याय प्रेक्षकांसाठी येत आहेत. चला, जाणून घेऊया कोणते चित्रपट आणि सीरिज कुठे पाहता येणार आहेत. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

सर्वात आधी, २७ ऑक्टोबरला ‘द वन अबाउट मॅथ्यू पेरी’ ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. २८ ऑक्टोबरला भुवन बामची ‘ढिंढोरा’ ही कॉमेडी सीरिज आणि ‘ड्राइव्ह: द प्रिटेंडर्स’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

२९ ऑक्टोबरला ‘बत्था’ हा तमिळ कॉमेडी-ड्रामा आणि ‘यू, मी, अस’ प्रदर्शित होणार आहेत. तर ३० ऑक्टोबरला मनोरंजनाची मोठी मेजवानी असेल. ‘अक्का’, ‘मीठे में क्या है’, ‘ऑब्सेशन’, ‘कोलिजन कोर्स’ आणि ‘हाऊ टू रुइन दिवाली: मीट द पेरेंट्स’ हे चित्रपट आणि सीरिज रिलीज होणार आहेत.

यापैकी काही नेटफ्लिक्सवर, तर ‘ऑब्सेशन’ जिओ हॉटस्टारवर पाहता येईल. तर मग मंडळी, तुम्ही कोणता चित्रपट किंवा वेबसीरिज पाहणार? कमेंटमध्ये नाव सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button