
शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी पाच हजार रुपयांच्या मदतीसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. नेमकी काय आहे नवीन अपडेट? सगळं काही सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रिम दुष्काळी मदत मिळणार आहे.
विशेष म्हणजे, ही रक्कम याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
या मदतीसाठी सरकारला तब्बल ७ हजार ५०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. म्हणजेच दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
दुसरीकडे, ई-केवायसी पूर्ण करूनही कर्जमाफी न मिळालेल्या ४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, आणखी ४ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्हाला शासनाचा हा निर्णय कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा.





