
दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे ! केंद्र सरकारच्या दिव्यांग पेन्शन योजनेत पात्रतेबाबत महत्त्वाचे बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नेमके काय आहेत नवे नियम? सांगतो. त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिव्यांगत्वाची मर्यादा ८० टक्क्यांवरून ४० टक्के करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय, यापूर्वी असलेली १८ वर्षांची वयोमर्यादा हटवण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना जन्मापासून लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तसेच यापूर्वी लाभापासून वंचित राहिलेल्या काही व्यक्तींनाही आता संधी मिळू शकते.
आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, दरमहा किती पैसे मिळणार? उपलब्ध माहितीनुसार, शून्य ते ७९ वर्षे वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा ३७५ रुपये, तर ८० वर्षे आणि त्यावरील लाभार्थ्यांना ६२५ रुपये अर्थसहाय्य दिलं जातं.
शिवाय, राज्य सरकारकडून अतिरिक्त मदत मिळू शकते. मात्र, अर्ज करण्यापूर्वी संबंधित योजनेचे अधिकृत नियम आणि पात्रता तपासा. तुम्हाला हे नवे नियम कसे वाटलेत? कमेंटमध्ये नक्की सांगा.





