
लक्झरी कार घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे ! लँड रोव्हरची दमदार Defender 110 SUV आता तब्बल ३४ लाख रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे. पण या गाडीची किंमत एवढ्या मोठ्या प्रमाणात का कमी झाली? सांगतो त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.
मंडळी, या गाडीच्या किमतीत कपात होण्यामागे भारतातच सुरू झालेली स्थानिक असेंब्ली हे प्रमुख कारण आहे. नवीन किमतीनुसार, २.० लिटर पेट्रोल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत आता ९९ लाख रुपये आहे. आधी हीच किंमत १ कोटी १३ लाख रुपये होती. म्हणजेच, तब्बल १४ लाख रुपयांची बचत ! तर ३.० लिटर पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटची किंमत आता प्रत्येकी १ कोटी १८ लाख रुपये झाली आहे.
याआधी या गाड्यांसाठी १ कोटी ५२ लाख रुपये मोजावे लागत होते. किंमत कमी करण्यासोबतच कंपनीने अनेक प्रीमियम फीचर्सही स्टँडर्ड दिले आहेत. यात एअर सस्पेन्शन, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल आणि प्रीमियम साउंड सिस्टीमसारख्या सुविधांचा समावेश आहे. तर मग मंडळी ज्याला Defender घ्यायची असेल त्याला ही रील लगेच शेअर करां.





