
हृदयाची काळजी घ्यायची असेल, तर फक्त व्यायाम करून चालणार नाही, तर आपल्या खाण्यापिण्याकडेही लक्ष द्यावं लागेल. विशेष म्हणजे, आहारात योग्य माशांचा समावेश केल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. कोणते आहेत ते मासे? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
पहिला मासा आहे सॅल्मन! यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं, जे रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करू शकतं.
दुसरा आहे बांगडा! हा भारतात सहज उपलब्ध होणारा मासा असून, त्यात प्रथिनं आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं.
तिसरा आहे सार्डिन! आकाराने लहान असलेल्या या माशामध्ये ओमेगा-३, प्रथिनं आणि व्हिटॅमिन बी-१२ आढळतं. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, आठवड्यातून किमान दोन वेळा मासे खाणं फायदेशीर ठरू शकतं. मात्र, मासे डीप फ्राय करण्याऐवजी वाफेवर शिजवणं किंवा कमी तेलात तयार करणं अधिक चांगलं.
लक्षात ठेवा, फक्त मासे खाल्ल्याने हार्ट अटॅक टळत नाही. संतुलित आहार आणि नियमित व्यायामही तितकेच महत्त्वाचे आहेत.
तुम्ही आठवड्यातून किती वेळा मासे खाता? कमेंट करून नक्की सांगा.





