Latest

लाडक्या बहिणीनंतर आता महाराष्ट्रात लाडकी विद्यार्थिनी योजना ! मुलींना मिळणार ६ हजार रुपयांची मदत, कोणाला मिळणार लाभ?

लाडक्या बहिणींनंतर आता विद्यार्थिनींसाठीही आर्थिक मदतीची योजना सुरू झाली आहे. याअंतर्गत मुलींना 6 हजार रुपये मिळणार आहेत. पण कशी आहे ही योजना? सांगतो आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी ‘ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना’ असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत सातवी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थिनींना वर्षाला ६ हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच दरमहा ५०० रुपये शैक्षणिक मदत दिली जाणार आहे. पण ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही, तर उल्हासनगर महानगरपालिकेने सुरू केली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू करण्यात आल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे, योजनेच्या अंमलबजावणीपूर्वीच १९ हजार विद्यार्थिनींची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी महापालिकेवर सुमारे ९ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

मात्र, योजनेच्या उद्घाटनाला भाजपचे नगरसेवक आणि उपमहापौर अनुपस्थित राहिल्याने शिवसेना-भाजपमधील अंतर्गत नाराजीची चर्चाही रंगली आहे. तुमच्या शहरातही विद्यार्थिनींसाठी अशी योजना सुरू व्हायला हवी का? कमेंट करून तुमचं मत सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button