
तीन वर्षांपासून चाहते वाट पाहतायत… पण आता भेडिया पुन्हा एकदा पडद्यावर डरकाळी फोडण्यासाठी सज्ज होतोय! मात्र, यासाठी चाहत्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नेमका कधी रिलीज होणार भेडिया 2 ? सांगतो. पण आधी अहिल्यानगर सिनेटॉक्सला फॉलो नक्की करा.
मंडळी, २०२२ मध्ये वरुण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हॉरर आणि कॉमेडीचा भन्नाट संगम असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ‘भेडिया २’ची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.
आता दिग्दर्शक अमर कौशिक यांनी स्वतः एक खास व्हिडीओ शेअर करत मोठी अपडेट दिली आहे. या व्हिडीओमध्ये एक लांडगा दिसतो आणि काही क्षणांतच तो भयानक रूप धारण करतो. सोबत त्यांनी मजेशीरपणे सांगितलं की, भेडिया पटकथा लिहिण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे नाराज आहे; पण आम्ही लवकरच येत आहोत.
म्हणजेच ‘भेडिया २’ची पटकथा सध्या लिहिण्याचं काम सुरू आहे. पटकथा पूर्ण झाल्यानंतरच प्रदर्शनाची तारीख जाहीर होणार आहे. तर मग मंडळी, तुम्ही ‘भेडिया २’ची वाट पाहताय का? कमेंटमध्ये नक्की सांगा!





