
राहुरीतील तिरंगा रॅलीदरम्यान भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या मिश्किल वक्तव्याने चांगलीच चर्चा रंगली. “मी मेंदूचा डॉक्टर आहे; पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला,” अशी टिप्पणी त्यांनी केली. याच कार्यक्रमात नगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरही त्यांनी भाष्य केलं.
रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याचं मान्य करताना, युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी विखे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही मिश्किल टीका केली. त्यांच्या युद्धामुळे डांबराच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं त्यांनी म्हटलं.
महामार्गाच्या कामावरून केवळ आंदोलन किंवा सोशल मीडिया पोस्ट हा उपाय नसून, नागरिकांनी काही काळ संयम ठेवावा, असं आवाहनही त्यांनी केलं. “नगर–मनमाड रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





