Latest

आमच्या खासदारांना CBI आणि RAW चे प्रमुख केलं पाहिजे : डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा टोला

अहिल्यानगरच्या बहुचर्चित सिस्पे आर्थिक घोटाळ्यात मुख्य आरोपी राहुल काळोखेच्या अटकेवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. खासदार नीलेश लंके यांनी या आरोपीचा दुबईतील ठावठिकाणा शोधण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांची टीम पाठवल्याचा दावा केला होता. त्यांच्या टीमने आरोपीचे वास्तव्य, व्यवसाय, ट्रेड लायसन्स, बँक खात्यांशी संबंधित माहिती आणि इतर कागदपत्रे मिळवल्याचे लंके यांनी सांगितले होते.

आता यावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मिश्कील टोला लगावलाय. ते म्हणाले, पोलिसांना ज्याचा शोध घेता आला नाही, त्याचा ठावठिकाणा आमच्या खासदारांनी शोधून काढला, हे आश्चर्यकारक आहे. म्हणून आपण केंद्रीय मंत्र्यांना विनंती करणार आहोत की, आमच्या खासदारांनी अशी कामगिरी केलीये तर त्यांना CBI आणि RAW दोन्ही शाखेचे प्रमुख करावं. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही अमित भाईंना यासाठी निवेदनही देणार आहोत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button