Latest

एका क्षणात सगळं संपलं ! अहिल्यानगरमध्ये पिकअप आणि दुचाकीच्या भीषण अपघातात मौलानाचा मृत्यू

अहिल्यानगरमधील तिसगाव येथील पेट्रोल पंपावर एक धक्कादायक दुर्घटना घडली. आलमगीर परिसरातील मौलाना इलियास हे पेट्रोल पंपावर असताना अचानक चारचाकी पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, या दुर्घटनेत मौलाना इलियास यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा संपूर्ण थरार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताचं फुटेज समोर आल्यानंतर या घटनेची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

क्षणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे मौलाना इलियास यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे आलमगीर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलिसांकडून सुरू असून, अपघात नेमका कसा घडला याबाबत अधिक माहिती तपासातून समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button