Latest

राम शिंदेंची घोषणा हवेतच ? जिल्हाभर पॅनल उभं करणार म्हणाले, पण यादी कर्जत-जामखेडपुरतीच !

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राम शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. राम शिंदे काल सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत होते, पण आज ते परस्पर उमेदवारांची यादी जाहीर करतात. यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होतायेत. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊयात. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

संपूर्ण जिल्ह्यात पॅनल उभं करणार, स्वतः निवडणूक लढवणार अशी भूमिका मांडली; पण प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यानंतर समोर आली ती कर्जत-जामखेडमधील अवघ्या चार उमेदवारांची यादी !

जिल्हाभर पॅनल उभं करण्याची घोषणा नेमकी कुठे गेली ? आणि स्वतः निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्यानंतर शिंदेंनी माघार का घेतली? हे प्रश्न आता चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेची निवडणूक ही सहकारातील ताकद दाखवण्याची संधी मानली जाते.

अशा वेळी मोठी घोषणा करून प्रत्यक्षात मर्यादित उमेदवारांची नावं जाहीर झाल्याने त्यांच्या नियोजनाबाबत चर्चा सुरू झाली आहे. राम शिंदे यांच्या या बदलत्या भूमिकेवर आपलं मत कमेंटमध्ये नक्की मांडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button