Latest

दिवाळीत हफ्त्यावर गाडी घेण्याचा विचार करताय? मग EMI च्या नादात या चुका करू नका !

दिवाळीला नवीन कार किंवा बाईक घेण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. शोरूममध्ये आकर्षक ऑफर्स दिसतात, कमी EMI सांगितली जाते आणि गाडी बुक करण्याचा मोह होतो. पण थांबा ! घाईत घेतलेला एक निर्णय तुमच्या खिशाला महाग पडू शकतो. म्हणून गाडी कर्जावर घेताना सर्वात आधी पाच गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या आहेत त्या गोष्टी सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

तर मंडळी, पहिली गोष्ट, फक्त कमी EMI पाहून कर्ज घेऊ नका. कर्जाचा कालावधी वाढला, तर एकूण व्याज जास्त भरावं लागू शकतं.
दुसरी गोष्ट, डाउन पेमेंटसाठी संपूर्ण बचत संपवू नका. अचानक खर्चासाठी पैसे शिल्लक असणं गरजेचं आहे.

तिसरी गोष्ट, प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्क तपासा. वेगवेगळ्या बँकांच्या कर्जांची तुलना करा.

चौथी गोष्ट, आपल्या उत्पन्नानुसार EMI ठरवा. घरखर्च आणि इतर जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका.

पाचवी गोष्ट, दिवाळीच्या ऑफर्स पाहून लगेच बुकिंग करू नका. गाडीची ऑन-रोड किंमत, विमा आणि मेंटेनन्सचाही हिशोब करा. तुम्ही गाडी कॅशने घेणार की EMI वर? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button