Latest

SBI ची 444 दिवसांची FD बनवणार मालामाल ! 5 लाख गुंतवल्यास किती व्याज मिळणार?

एफडी करायचीय ? मग एसबीआयची अमृत वृष्टी FD योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. कशी आहे योजना ? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 444 दिवसांच्या विशेष FD योजनेत सामान्य ग्राहक, ज्येष्ठ नागरिक आणि 80 वर्षांवरील अतिज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे व्याजदर लागू आहेत.

21 ऑक्टोबर 2026 रोजीच्या माहितीनुसार, सामान्य ग्राहकांना वार्षिक 6.45 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 6.95 टक्के, तर 80 वर्षांवरील नागरिकांना 7.05 टक्के व्याजदर मिळू शकतो.

आता समजा, सामान्य ग्राहकाने 5 लाख रुपये 444 दिवसांसाठी गुंतवले, तर दिलेल्या अंदाजानुसार मुदतपूर्तीवेळी सुमारे 5 लाख 40 हजार रुपये मिळू शकतात. म्हणजेच जवळपास 40 हजार रुपये व्याज मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, लक्षात ठेवा! हा अंदाज आहे. प्रत्यक्ष परतावा व्याजाच्या पर्यायावर आणि बँकेच्या अटींवर अवलंबून असेल. मुदतपूर्व पैसे काढल्यास दंडही लागू शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी SBI कडून सध्याचे व्याजदर आणि नियम तपासा. तुम्ही FD मध्ये पैसे गुंतवता का? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button